चांदापुरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

Talk18 मराठी l आण्णा भोसले :
चांदापुरी : जयंती उत्सव समिती व गावातील ज्येष्ठ मान्यवर यांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, सदाशिवराव निवासी प्रशाला तसेच भिमरत्न तरुण मंडळ, चांदापुरी चौक यांच्या वतीने काल गावातील विविध ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0143,0.0000;
brp_del_sen:0.1000,0.0000;
motionR: 0;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.52277744, 0.6552897);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, शिक्षण, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांची आजच्या समाजात अधिक गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
भिमरत्न तरुण मंडळाच्या वतीने चांदापुरी व परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चांदापुरी गावचे भूमिपुत्र प्रा. सरक सर यांना पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने प्राप्त ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराबद्दल विशेष सन्मान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते केशवराव पाटील, सरपंच जयवंत सूळ, भजनदास चोरमले, विजयसिंह पाटील, विलास धुलूगडे, दिलीप सरतापे, हणमंत सरतापे, महादेव सरवदे, बापू लोखंडे, मोहन सरतापे, अरुण बोडरे, विजय निकम, तात्या चोरमले, शाहिद शेख, शिवाजी गोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रा. सरतापे, सत्यवान देठे, दादा सरतापे, भीमराव ढेरे, बाबा देठे, प्रवीण देठे, समाधान साबळे, राजू खरात, जयराम सातपुते, विजय कवळे, तात्या सातपुते, अक्षय देठे, समाधान खरात, दिनेश गाडे, किरण देठे, अमोल सरवदे, तात्या लोखंडे, यश पाटील, आण्णा भोसले यांच्यासह शिक्षक,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून, गावात सामाजिक ऐक्य व जागृतीचा संदेश देणारा ठरला.


