धानोरे–शेंडेचिंच येथे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते जलपूजन,शेतकऱ्यात समाधानाची लाट

Talk18 मराठी प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील धानोरे येथील ओढा आणि शेंडेचिंच येथील बंधाऱ्यामध्ये झालेल्या पाणी साठ्याच्या पार्श्वभूमीवर जलपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या दोन्ही ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.धानोरे व शेंडेचिंच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी करत या जलसोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नांमुळे ओढा व बंधारा पाण्याने भरल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, एन उन्हाळ्याच्या तोंडावर आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्याचा थेट फायदा शेतीला होणार आहे, असा विश्वास स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी दोन्ही गावातील नागरिकांनी आमदार जानकर यांचे मनापासून आभार मानत त्यांचा यथोचित सन्मान केला. विशेष म्हणजे शेतकरी वर्गातून आमदारांचा सत्कार करण्यात आला.
जलसोहळा केवळ पूजनापुरता मर्यादित न राहता, परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आणि आशेचा किरण ठरला आहे.


