महाराष्ट्र
चांदापुरी येथील अहिल्यादेवी हणमंत जाधव यांचे निधन

Talk18 मराठी |आण्णा भोसले l
चांदापुरी येथील कै.अहिल्यादेवी हणमंत जाधव यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी अश्विनी हॉस्पिटल, अकलूज येथे दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
अहिल्यादेवी जाधव यांच्या निधनाने चांदापुरी परिसरात शोककळा पसरली असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या स्वभावाने हसतमुख, मनमिळावू व प्रेमळ होत्या. समाजात त्यांचा आदर होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रगतशील बागायतदार भिमराव हणमंत जाधव यांच्या मातोश्री होत्या.


