महाराष्ट्र

निमगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी–शिवसेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्ता भैय्या मगर प्रचारात आघाडीवर

Talk18 मराठी l आण्णा भोसले :

निमगाव पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार पै. दत्ता भैय्या मगर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.

सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले आणि बळीराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले दत्ता भैय्या मगर यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि युवकांसाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. याच कामाच्या जोरावर त्यांना गावागावातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या प्रचारफेऱ्यांमधून दिसत आहे.

“निमगाव गणातील सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे. ही निवडणूक माझी नसून जनतेच्या हक्काची लढाई आहे,” असा ठाम निर्धार दत्ता भैय्या मगर यांनी व्यक्त केला. प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर ते भर देत आहेत.

मोहिते पाटील परिवाराशी असलेले जुने कौटुंबिक ऋणानुबंध, तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याशी निगडित असलेल्या कै. नानासाहेब मगर व मल्ल सम्राट रावसाहेब मगर यांच्या सामाजिक परंपरेचा वारसा दत्ता भैय्या मगर यांना लाभला आहे. त्यामुळे पारंपरिक पाठबळासोबत नव्या मतदारांचा विश्वासही त्यांना मिळताना दिसतो आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये “ही उमेदवारी दत्ता भैय्यांची नसून जनतेची आहे” अशी चर्चा रंगत असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी निमगाव पंचायत समिती गणातील निवडणूक आता चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

निमगाव गणात प्रचाराचा वेग वाढत असताना दत्ता भैय्या मगर हे सध्या आघाडीवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button