शनिवारी पानंद रस्त्या संदर्भात ‘शिवरत्न’वर बैठकीचे आयोजन

Talk18 मराठी प्रतिनिधी :
माढा लोकसभा मतदारसंघातील पानंद रस्ते कामांच्या अनुषंगाने शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता शंकरनगर येथील ‘शिवरत्न’ बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हि बैठक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार असून,या बैठकीस मा. आमदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच मा. आमदार श्री. उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पानंद रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा होऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सदर बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.


