
महाळुंग-श्रीपूर | मंगळवार, दि. २ जून २०२६
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत हद्दीतील रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रलंबित हप्ते तात्काळ वितरित करण्यात यावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

RPI चे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते सुधीर भोसले यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. घरकुल योजनेचे हप्ते रखडल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण अवस्थेत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी युवा नेते राजाभाऊ शिंदे, हनुमंत भोसले, आनंद केंगार, राहुल भोसले, शंकर चव्हाण, आनंद भोसले, भीमराव आठवले, श्री. कुलकर्णी, संजय चव्हाण, हरिदास सुतार, मेंबर विठ्ठल चव्हाण, सनी सरतापे तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
— Talk18 मराठी
“जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास”


