Uncategorizedमहाराष्ट्र

वीज ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसवले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची ग्वाही

नागपूर : राज्यात महावितकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरु असून त्यांच्या उपस्थितीतच हे मीटर बसवले जातील,
अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार विधानसभेत दिली.
राज्यातील अनेक शहरामध्ये स्मार्ट मीटर कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरु आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असूनही त्यांच्याकडून वसुली सुरु आहे,
आदी मुद्दे राजेश मोरे यांनी प्रश्न उपस्थितीत केला होता.
या चर्चे दरम्यान शिवशेनेचे (उद्धव ठाकरे )गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी स्मार्ट मीटर सक्तीचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुरवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रिपेड मीटर लावण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यावर मोठया प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आल्याने राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने अंमलबजावणीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात फिडर मीटर आणि डिस्ट्रिब्युशन मीटर बसवण्यात आले असून, सध्या शासकीय कार्यालये व आस्थापनामध्ये प्रिपेड मीटर बसवण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांसाठी मात्र पोस्टपेड स्मार्ट मीटरचं बसवले जात आहेत.

*वीज बिलात 10% सवलत*

स्मार्ट मीटर स्वीकारण्याच्या ग्राहकांच्या वीजबिलत 10% सवलत देण्यात आली असल्याने आत्तापर्यंत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना प्रत्येक्ष लाभ झाला नाही. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोबाईल अँपच्या माध्यमातून तासागणिक वीज वापरण्याचा तपशील मिळतो, त्यामुळे वापराची पडताळणी करणे सोपे झाले आहे. याशिवाय 24 तास तक्रार निवारन वेवस्था उपलब्ध असून, आत्तापर्यंत पाच वेगवेगळ्या कंपन्यांनी बसवलेल्या स्मार्ट मीटर मध्ये केवळ एक टक्क्यापेक्षा कमी त्रुटी आढळ्या आहेत. पुढील पाच वर्षे स्मार्ट मीटर पोस्ट पेड स्वरूपातचं राहणार असून, प्रिपेड मीटर सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नाही.
विधानसभा सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे आस्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button