मंत्री भरतशेठ गोगावले येणार निमगावात — ठवरे, मगर, माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Talk18 मराठी l आण्णा भोसले :
माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि आरपीआय आठवले गट या मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा होणार आहे.
या सभेत निमगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. निलावती मच्छिंद्र ठवरे, निमगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय रावसो मगर तसेच गोरडवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. रेश्माताई जगन्नाथ माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
सभेसाठी राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून, कॅबिनेट मंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत —
▪️ मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील
▪️ माजी आमदार व शिवसेना उपनेते शहाजीबापू पाटील
▪️ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
▪️ आमदार उत्तमराव जानकर
या मान्यवरांच्या उपस्थित ही जाहीर सभा बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, निमगाव (म) येथे पार पडणार आहे.
मित्र पक्षांनी सर्व मतदार बंधू-भगिनी, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या सभेमुळे निमगाव परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


