आमदार उत्तमराव जानकर अध्यक्ष; कामगार सल्लागार समितीची नवीन समिती गठीत

Talk18 मराठी प्रतिनिधी :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या आदेशानुसार माळशिरस विधानसभा मतदारसंघासाठी “बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार समिती” स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश दिनांक २३ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने माळशिरस तालुका, सोलापूर.अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीमध्ये तालुक्यातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व देण्यात आले असून सदस्य म्हणून सुधीर हनुमंत पवार, विकास दादा धाईंजे, वर्षा बलभीम रसाळ , शमशाद बेगम अकबर शिकलगर, शिवराज जगदीश निंबाळकर आणि रणजीत दिगंबर सातपुते यांचा समावेश आहे. तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही समिती बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे, स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा आढावा घेणे आणि शासन निर्णयानुसार मार्गदर्शन करणे यासाठी कार्य करणार आहे. समितीच्या कार्यकक्षेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या नियुक्तीमुळे माळशिरस तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना अधिक वेगाने न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


