मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील सुरज हनुमंत रणदिवे यांचे अकाली निधन

Talk18 मराठी
मारकडवाडी ता.माळशिरस येथील तरुण युवक सुरज हनुमंत रणदिवे (वय ३०) यांचे शुक्रवार दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
सुरज रणदिवे हे जनसत्ता न्यूजचे संपादक सचिन हनुमंत रणदिवे यांचे लहान बंधू होते. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण रणदिवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील, भाऊ व भावजय असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मारकडवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या सुरज रणदिवे यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ईश्वर दिवंगत सुरज रणदिवे यांच्या आत्म्यास शांती देवो व रणदिवे परिवारास या अपार दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच Talk18 मराठी परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. 🙏


