रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी रतन टाटांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर; “टाटा प्रेमी” युवक विकास भगत यांचा प्रेरणादायी उपक्रम

Talk18 मराठी/आण्णा भोसले वेळापूर :उद्योगविश्वातील आदरणीय व्यक्तिमत्त्व स्व.रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दिनांक 28/12/2025 रोजी,वेळापूर येथील टाटा प्रेमी युवक विकास भगत यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपती नव्हते, तर मानवतेचा विचार जगणारे नेतृत्व होते.त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून विकास भगत यांनी रक्तदानासारखा सामाजिक व जीवनदायी उपक्रम आयोजित करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.
टाटा समूहावर निष्ठा असलेले विकास भगत हे फक्त टाटा ब्रँडचे चाहते नसून,रतन टाटा यांच्या सामाजिक विचारांचे खरे अनुयायी आहेत.“नफा नाही, माणुसकी महत्त्वाची” हा रतन टाटा यांचा विचार या रक्तदान शिबिरातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आला आहे.या शिबिरास परिसरातील युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित असून,रक्तदान करून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विकास भगत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
👉 रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त समजूपयोगी कार्यातून अभिवादन करण्याचा आदर्शवेळापूर येथील टाटा प्रेमी युवक विकास भगत यांनी या उपक्रमातून घालून दिला आहे.


