
Talk18 मराठी सदाशिवनगर :
सदाशिवनगर, ता. माळशिरस येथील उपसरपंच श्रीमती सुमन नारायण भोसले यांचे वयाच्या ७८व्या वर्षी शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

श्रीमती सुमन भोसले यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले तसेच राजेंद्र भोसले यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच भोसले परिवारासह नातेवाईक, मित्रपरीवार,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिवंगत सुमन भोसले यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच Talk18 मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


