Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

पालखी मार्गावरील दलित वस्तीच्या पाणीप्रश्नी युवा सेना आक्रमक; वारीपूर्वी नवी टाकी उभारण्याची मागणी

Talk18 मराठी l अकलूज प्रतिनिधी :

अकलूज : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील कर्मवीर चौक, मसूदमळा (दलित वस्ती) येथे असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माळशिरस विधानसभा संपर्क प्रमुख विजय भाऊ कोकणे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक वर्षांपूर्वी उभारलेली ही पाण्याची टाकी पूर्णपणे मोडकळीस आली असून, टाकीतील पाणी गळतीमुळे बाहेर सांडत आहे. तसेच पाणी उघड्यावर राहत असल्याने ते दूषित होऊन नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या टाकीवर परिसरातील सुमारे ५०० ते ६०० नागरिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

विशेष म्हणजे, कर्मवीर चौक हा पंढरपूर पालखी मार्गावर असल्याने आषाढी वारीदरम्यान हजारो वारकरी या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे वारीपूर्वीच जीर्ण पाण्याची टाकी हटवून त्या ठिकाणी नवीन, मजबूत आणि टिकाऊ पाण्याची टाकी उभारण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक खंडागळे, आकाश लोखंडे, आकाश होनमाने, भारत जगताप, अब्दुल शेख, अनिकेत निचळ, अविनाश सोनावणे, जय निचळ, भैय्या गाडे, राहुल लोंढे, राहुल गवळी, शंभू गिरी, स्वप्नील निचळ आणि भैय्या गवळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता या निवेदनानंतर नगरपरिषद प्रशासन वारीपूर्वी या महत्त्वाच्या प्रश्नावर काय निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांसह वारकरी बांधवांचेही लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button