Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

अकलूजकरांना १५ जुलैपर्यंत पाणीटंचाईचा सामना; नगरपरिषदेकडून बोअरवेल व टँकरद्वारे पाणीपुरवठा

Talk18 मराठी अकलूज प्रतिनिधी : २ जुलै, २०२६

अकलूज शहरातील नागरिकांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. अकलूज नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटनुसार, वीर धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे साठवण तलावात पाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नगरपरिषदेने यासंदर्भात २३ जून २०२६ रोजी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केली होती. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, १२ जुलैपासून धरणातून पाणी सोडण्यात येणार असून, १५ जुलैपर्यंत साठवण तलावात पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

तोपर्यंत शहरातील ४६ बोअरवेलपैकी कार्यरत ३४ बोअरवेलच्या माध्यमातून सार्वजनिक नळजोडण्यांना पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात बोअरवेल उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

नगररिषदेकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Talk18 मराठी – जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button