Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

नातेपुते येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती महोत्सवाचे आयोजन

दिनांक : २२ सप्टेंबर २०२६ | वार : मंगळवार

नातेपुते | प्रतिनिधी :रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

. २२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. गेली पंधरा वर्षे सातत्याने हा सामाजिक उपक्रम संस्थापक अध्यक्ष विशाल साळवे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या यांच्या माध्यमातून होत आहे.

या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल साळवे यांनी दिली.

या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विशाल साळवे यांनी केले आहे.

📅 रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६

⏰ सकाळी ११.०० वाजता📍 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नातेपुते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button