व्हाईस ऑफ मिडियाचे माळशिरस तालुका संघटक पत्रकार आमिर मोहोळकर यांच्या पत्नी परवीन मोहोळकर यांचे दुःखद निधन
अकलूज | सोमवार, दि. ८ जून २०२६
माळशिरस तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. व्हाईस ऑफ मिडियाचे माळशिरस तालुका संघटक तसेच “अकलूज एक्सप्रेस”चे संपादक पत्रकार आमिर मोहोळकर यांच्या पत्नी नुजहत परवीन आमिर बागवान (मोहोळकर) यांचे अल्पशा आजाराने दि. ६ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे ४५ वर्षे होते.
स्वर्गीय पत्रकार युसुफ मोहोळकर यांच्या त्या सून होत्या. त्यांच्या निधनामुळे मोहोळकर कुटुंबासह संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा, दोन दिर, सासू, जावई, नात तसेच मोठा बागवान–मोहोळकर परिवार असा आप्तपरिवार आहे.
परवीन मोहोळकर यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी मोहोळकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या.
Talk18 मराठी परिवाराकडून स्वर्गीय नुजहत परवीन आमिर बागवान (मोहोळकर) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व मोहोळकर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🕊️🙏


