
Talk18 मराठी | अकलूज प्रतिनिधी :
महाराष्ट्र मातंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक ज्ञानदेव भाऊ खंडागळे यांचे वडील तुकाराम खंडागळे यांचे आज पहाटे ४.३० वाजता वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने खंडागळे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरात शोककळा पसरली आहे.
तुकाराम खंडागळे यांच्या पश्चात पत्नी भामाबाई, मुलगी शोभा, मुले ज्ञानदेव, बाळासाहेब, पांडुरंग आणि विठ्ठल, चार सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
खंडागळे कुटुंबीयांची वारकरी संप्रदायावर श्रद्धा असून, अध्यात्म, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा कुटुंबाने जपली आहे. धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये कुटुंबीयांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. व्यवसायासोबतच समाजाशी असलेली नाळ कायम ठेवत या कुटुंबाने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ज्ञानदेव भाऊ खंडागळे, पांडुरंग भाऊ खंडागळे आणि विठ्ठल भाऊ खंडागळे हे बंधू व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे. खंडागळे कुटुंबीय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रस्थानी असल्याने तुकाराम खंडागळे यांच्या निधनाने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
तुकाराम खंडागळे यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी खंडागळे कुटुंबीयांशी संपर्क साधून शोकभावना व्यक्त केल्या.
९२ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्याचा प्रवास पूर्ण करून तुकाराम खंडागळे यांनी घेतलेली अखेरची विश्रांती ही कुटुंबीयांसाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या व संस्कारांच्या आठवणी कुटुंबीयांच्या स्मरणात सदैव राहतील.
Talk18 मराठी परिवाराकडून वैकुंठवासी तुकाराम खंडागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली


