Uncategorized

व्हॉइस ऑफ मीडियाचे माळशिरस तालुका सचिव रणजितदादा गायकवाड यांना “शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर

26 मे 2026

Talk18 मराठी | माळशिरस प्रतिनिधी

पत्रकारितेतील निडर, रोखठोक आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत व्हॉइस ऑफ मीडियाचे माळशिरस तालुका सचिव तथा संघर्ष योद्धाचे प्रतिनिधी रणजितदादा कांतिलाल गायकवाड यांना मानाचा “शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक रोखठोकच्या वर्धापन दिनानिमित्त हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जात असून माळशिरस तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

पत्रकार म्हणून काम करताना रणजितदादा गायकवाड यांनी अनेक संवेदनशील विषयांवर निर्भीड आणि सडेतोड वार्तांकन केले आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले असून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप तसेच गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांत ते नेहमी सक्रिय असतात.

त्यांच्या याच समाजहिताच्या कार्याची दखल घेत दैनिक रोखठोकच्या वतीने त्यांची “शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दि. २७ मे रोजी कोल्हापूर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यसभा सदस्य मा. रामरावजी वडकुते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे राहणार असून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज भिवटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, प्रशांत सातव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ही बातमी समजताच माळशिरस तालुक्यासह विविध स्तरांतून रणजितदादा गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button