माळशिरसमध्ये निवडणूक रंगतदार, तब्बल 114 उमेदवारांची माघार

माळशिरस | Talk18 मराठी आण्णा भोसले
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तालुक्यात तब्बल 114 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याने अनेक गट व गणांमधील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटांमधून 78 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यापैकी 47 उमेदवारांनी माघार घेतली, तर आता 31 उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत.
या घडामोडींमुळे लढती ह्या जोरदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांमधील अंतर्गत समझोते, स्थानिक समीकरणे आणि मतदारसंघातील जातीय व स्थानिक पातळीवरील समीकरणांचा यावर मोठा प्रभाव असल्याचे जाणकार सांगतात.
माघारीनंतर आता खरी रंगत प्रचारात येणार असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


