
Talk18 मराठी l सोमवार 17 ऑगस्ट 2026 :
माळशिरस प्रतिनिधी : यशवंत सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री मा. श्री. बाळासाहेब दोडतले साहेब यांच्या आदेशानुसार आणि यशवंत सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रकाश वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. शितल नंदकुमार गुजरे यांची यशवंत सेना, सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल शितल गुजरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी मा. श्री. सुहास सीद, मा. श्री. उमेश शिंदे, मा. श्री. भैय्यासाहेब शिंदे, मा. श्री. राहूल जावीर, मा. श्री. योगेश वाघेला, मा. श्री. सौरभ शिंदे, मा. श्री. धनाजी पिसे आणि मा. श्री. राजू शेंडे यांची उपस्थिती लाभली.

नवीन जबाबदारीबद्दल बोलताना शितल गुजरे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले. पक्षाने दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी हा केवळ सन्मान नसून समाजहितासाठी अधिक जोमाने व प्रामाणिकपणे कार्य करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
यशवंत सेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी तसेच समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून काम करणार असून, सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शितल गुजरे यांनी व्यक्त केला.


