Uncategorized

स्थानिक स्वराज्य संस्थांत दिव्यांगांना आरक्षण व प्रतिनिधित्व द्या : गोरख जानकर

माळशिरस | प्रतिनिधी

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांमध्ये दिव्यांगांना आरक्षण व प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी केली आहे.

दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मांडण्यासाठी प्रतिनिधी उपलब्ध राहत नाहीत. परिणामी दिव्यांगांच्या समस्या दुर्लक्षित राहतात. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होता यावे, यासाठी निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे, असे जानकर यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिकांमध्ये दिव्यांग प्रतिनिधी असणे गरजेचे असून, त्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागतील व त्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकांमध्ये दिव्यांगांना आरक्षण मंजूर करून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

— Talk18 मराठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button