
Talk18 मराठी l २५ जुलै शनिवार :
सदाशिवनगर | प्रतिनिधी
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर येथे 2026-27 च्या गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम शुक्रवार (दि. 24 जुलै) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत रोलर पूजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रसंगी व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, जि.प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, ॲड. नितीन खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष देवीदास ढोपे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सरपंच विरकुमार दोशी, माजी उपसरपंच उदय धाईजे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच विष्णू भोंगळे, शिवराज निबाळकर, एकनाथ वाघमोडे, सतीश फडतरे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, संतोष शिंदे, माऊली निबाळकर, बलभिम निंबाळकर, बबन भुजबळ, तुकाराम चव्हाण, जगन्नाथ जाधव, सागर उरवणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कारखान्याचे संचालक दत्तुकाका रणनवरे, ॲड. सुरेश पाटील, महादेव शिंदे, बाळासाहेब माने, दादा पाटील, सुधाकर पोळ, शिवाजी गोरे, सुनील माने, सदाशिव वाघमोडे पाटील, रामदास कर्णे, रणजित पाटील, सचिन लोकरे, रामभाऊ खुळे, अर्जुन धाईंजे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, चीफ इंजिनिअर समाधान कागदे, चीफ केमिस्ट अभिजित माने, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, डिस्टिलरी मॅनेजर संजय मोरे, डेप्युटी चीफ इंजिनिअर निलेश जाधव, लेबर ऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, परचेस ऑफिसर उत्तम सपकाळ, लिगल ऑफिसर पंकज फडतरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोलर पूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी आगामी 2026-27 गळीत हंगाम यशस्वी, सुरळीत आणि विक्रमी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


