Uncategorizedअकलूजमहाराष्ट्रविशेषसंपादकीय

सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर : अजीम सय्यद यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Talk18 मराठी अकलूज प्रतिनिधी :

अकलूज येथील नामांकित व्यक्तिमत्त्व तथा नुरहसन सय्यद गुरुजी (थोरले) यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजीम हाजी नुरहसन सय्यद (वय ८१ वर्षे) यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातू-नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुजीब सय्यद व इमरान सय्यद यांचे ते वडील होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते अमजद सय्यद व साजीद सय्यद यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

त्यांच्या कुटुंबात तीन बहिणी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सेवा निवृत्त शिक्षिका), एक बंधू (सेवा निवृत्त सिव्हिल इंजिनियर) तसेच एक बंधू ट्रक मालक आहेत.

त्यांच्या निधनाने अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button