Uncategorizedअकलूजआरोग्यक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग तात्या वाघमोडे मित्रपरिवाराच्या वतीने विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा भव्य सन्मान

25 मे 2026

Talk18 मराठी l माळशिरस :

माळशिरस येथे विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भव्य अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

माळशिरस नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी रघुनाथ चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवसेना जिल्हा ओबीसी प्रमुखपदी सुमित भाऊ जानकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यासोबतच अनिल वाघमोडे यांची API पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, युवानेते सागर पवार, विश्वजित पाटील आणि संतोष वाघमोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

हा अभिनंदन सोहळा मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग तात्या वाघमोडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच माणिक बापू वाघमोडे, डॉ. मारुती पाटील, विकास दादा धाईंजे, सुरेश आबा वाघमोडे, अनिल सावंत, किरण सावंत, सागर धाईंजे, विकास लषकरे, गणेश काटे, दादासाहेब पांढरे, रशीद मुलाने, नगरसेवक कैलास वामन, संजय वाघमोडे, बापूसाहेब पाटील, संजय जगताप, प्रदीप धाईंजे, भैय्या धाईंजे, रणजित धाईंजे, सोईल नलवडे, सुरेश अध्यक्ष वाघमोडे, नवनाथ भिसे, सचिन वाघमोडे, महादेव वाघमोडे, राजू वाघमोडे, अक्षय वाघमोडे, आण्णा वाघमोडे, हैदर अली आणि रोहित वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या समारंभात उपस्थित निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजकारण व जनसेवेत अधिक जोमाने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button