Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

चांदापुरी परिसरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विविध शाळांमध्ये देशभक्तीचा जल्लोष

Talk18 मराठी l रविवार l 16 ऑगस्ट 2026 :

आण्णा भोसले l चांदापुरी : चांदापुरी ग्रामपंचायत कार्यालयासह जिल्हा परिषद शाळा शेख-कोळपे वस्ती, सुळवस्ती, आंबेकरवस्ती, सदाशिवराव देठे प्रशाला, प्रतापसिंह विद्यालय काळे वस्ती तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळा, चांदापुरी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

चांदापुरी ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच जयवंत सूळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हा परिषद केंद्र शाळा, चांदापुरी येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी शेतकरी पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले, सरवदे गुरुजी, माजी पोलीस उपनिरीक्षक कवळे साहेब, युवा नेते विजय पाटील आणि पत्रकार आण्णा भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, संविधानाची मूल्ये आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिताराम सरक व अक्षय सरक यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, चांदापुरी परिसरातील जिल्हा परिषद शाळा शेख-कोळपे वस्ती, सुळवस्ती, आंबेकरवस्ती, सदाशिवराव देठे प्रशाला आणि प्रतापसिंह विद्यालय काळे वस्ती येथेही ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम पार पडले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते केशवराव पाटील, सरपंच जयवंत सूळ, ज्येष्ठ नेते भजनदास चोरमले, भगवान बापू सुळ, युवा नेते विजयसिंह पाटील, उपसरपंच दिपाली रामभाऊ निकम, माजी उपसरपंच हनुमंत सरतापे, अजित लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब शिंदे, चांदापुरी विकास सोसायटीचे चेअरमन बापू लोखंडे, सरवदे गुरुजी, माजी पोलीस उपनिरीक्षक कवळे साहेब, माजी उपसरपंच संतोष कोपनर, भाजपाचे युवा नेते शाहिदभाई शेख, माजी उपसरपंच तात्यासो चोरमले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिताराम सरक, उपाध्यक्ष नामदेव बोडरे, शिवाजी गोडवे, संजय लोखंडे, पत्रकार आण्णा भोसले, आरपीआयचे अध्यक्ष प्रवीण देठे, पत्रकार राजू खरात, केंद्रप्रमुख संभाजी औटी, शिक्षक चंदनशिवे सर, डॉ. शिवाजी चौगुले सर, ग्रामस्थ तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

चांदापुरी परिसरातील विविध शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button