अकलूजमहाराष्ट्र

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; माळशिरस तालुक्याला 90 कोटींचा निधी

Talk18 मराठी l आण्णा भोसले

माळशिरस : राज्याच्या अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ९० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली असून, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

या निधीतून तालुक्यातील पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय इमारतींसाठी महत्त्वाची कामे होणार आहेत. माळशिरस येथे शासकीय विश्रामगृहासाठी ६४.४० लाख रुपये, तर पिलीव येथे शासकीय विश्रामगृहासाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.याशिवाय माळशिरस जिल्हा सत्र न्यायाधीश इमारतीसाठी २ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच अकलूज दुय्यम निबंधक कार्यालय इमारतीसाठी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.दरम्यान, गणेशगाव को. प. बंधारा दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे.तसेच ग्रामीण रस्ते, प्रमुख जिल्हामार्ग आणि लहान-मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विकासाला गती मिळणार आहे.

माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाने केलेल्या या निधी तरतुदीबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button